ऍडम लंडनहून आला, त्याला आणण्यासाठी सेलेस्ट विमानतळावर गेली होती. दोघेजण आले ते थेट डॅमनच्या रूमवर गेले. दोघे भाऊ एकमेकांच्या मिठीत मनसोक्तपणे रडले. दोनच दिवसात डॅमनच्या वेदना इतक्या वाढल्या की द्रवरूप मॉर्फिननेही त्या कमी होईनात, आम्ही लगेच डॅमनच्या खास दोस्तांना फोन करून बोलावून घेतलं. दुसर्या दिवशी टॉबी आला. त्यानंच सेलेस्टशी डॅमनची ओळख करून दिली होती. आता सेलेस्ट म्हणजे त्याची जीव की प्राण होती.
१ एप्रिल १९९१, एप्रिल फूलचा दिवस! पहाटे लवकर उठून मी नेहमीप्रमाणे धावण्याचा व्यायाम करण्यासाठी बीचवर गेलो. थोड्याच वेळात पूर्वेला आभाळाला लाली यायला लागली होती. माझ्या डोळ्यांसमोर लहानपणीचा गुलाबी, गोबरा डॅमन उभा राहिला. ते मनोहर दृश्य पहात असतानाही माझे डोळे भरून आले. जितक्या वेगात धावता येईल तितक्या वेगानं मी घराकडे धावलो. शेवटी असं वाटायला लागलं की माझा ऊर फुटतोय की काय! घरी येऊन थेट गच्चीत गेलो. अश्रू आवरेनात. मी पोटभर रडून घेतलं. खाली आलो. कॉफी बनवली अन् बेनिटाला उठवलं. ब्रेटला बोलावून घेतलं.
आम्ही सगळेजण सिटींगरूममध्ये बसलो होतो. मूकपणे आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होतो की डॅमनचे अखेरचे क्षण त्याला सुसह्य होवोत! सेलेस्ट डॅमनजवळ बसून त्याचं मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करीत होती. सूर्याची सोनेरी किरणं सिडनेला प्रकाशमान करीत होती, अन् इकडे आमच्या वंशाचा दिवा विझत चालला होता! आम्ही आलटून पालटून डॅमनजवळ बसून त्याचा अखेरचा निरोप घेत होतो. इतक्या वेळ आवरलेले अश्रू अखेर गालावरून ओघळलेच.
त्याही अवस्थेत डॅमननं माझे हात हातात घेतले अन् क्षीणपणे हसून म्हणाला, "धन्यवाद डॅड! आजवर तुम्ही माझ्यासाठी जे केलंत त्याचे पांग मी फेडू शकलो नाही. माझं तुमच्यावर अपार प्रेम आहे."
डॅमनने अखेरचा श्वास सेलेस्टच्या बाहुपाशातच घेतला. तिला शेवटी डॅमनला गमवावंच लागलं! तो कुणी संत महंत नव्हता पण त्याच्या आयुष्याचा आलेख असामान्य होता! त्यानं आम्हाला आयुष्यावर, माणसांवर प्रेम करायला शिकवलं. प्रत्येक क्षण तो खर्या अर्थानं जगला. त्यानंतर काही दिवसांनी डॅमनचे डॉक्टर आम्हाला मुद्दाम भेटायला आले. आता ते आमच्या घरातलेच झाले होते.
ते म्हणाले, "ब्राईस, डॅमन हा माझ्या करिअरमध्ये, मी पाहिलेला पहिला असामान्य पेशंट होता! त्याला वीराचं मरण आलं. पराभव पत्करायच्या आधी त्याने अठरा वर्ष प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज दिली!"

No comments:
Post a Comment