पुंता अरीनासला येण्याची मुख्य कारणं दोन. उत्तरेचं नॅशनल पार्क आणि इथल्या प्लाता नदीमधल्या बेटावर असणारी पेन्ग्विन पक्ष्यांची वसाहत. 'इव्हिनिंग सूट' घातलेल्या ढेरपोट्या, गंभीर व्यापार्यांसारखे वाटणारे हे पक्षी आजपर्यंत फक्त प्राणिसंग्रहालयातच दिसले होते. त्यांच्या वसाहतींवरचे निसर्गपट टी. व्ही. वर मन लावून पाहिले होते. बर्फाच्या शुभ्र गालिच्यावर ताठ घसरत जाणारे, त्यातल्या फटीतून चटकन सूर मारून मासे पकडणारे पक्षी त्यात लाखांनी एकत्र दिसले होते. पण चित्रात पाहणं वेगळं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहणं फार वेगळं. प्रजोत्पादनासाठी पेन्ग्विन अँटार्क्टिकाहून इथल्या नदीमधल्या बेटावर येतात. ते पाहण्याची तीव्र इच्छा होती. तिला पुंता अरीनासच्या विमानतळावरच शह मिळाला.
'या दिवसात कुठले पेन्ग्विन्स?' आम्हांला भाड्याची गाडी देणारा कंपनी प्रतिनिधी म्हणाला होता, "आता त्या कॉलनीत कुणी नाही. हा ऑगस्ट महिना. अजून ते अँटार्क्टिकात आहेत. उन्हाळा आला की नोव्हेंबरमध्ये ते तिकडून इकडे येतात."
या नवलाईच्या पण तद्दन बुद्दू पक्ष्यांना आता काय म्हणावं? सध्या तिथं बर्फाच्या लाद्यांखाली पुरून बसण्यापेक्षा इथं पुंता अरीनासला नाही का यायचं? त्यांनाही (त्या मानानं) गरम हवा मिळाली असती आणि आम्हांलाही ते पाह्यला मिळाले असते. हे पक्षी निसर्गतः फक्त तीन ठिकाणी राहतात. इथं अँटार्क्टिकाजवळ, न्यूझीलंडला किंवा विषुववृत्तावरच्या गालापागोस बेटांवर. पैकी इथल्या वसाहती सर्वांत भरदार. काळापांढरा टेलकोट घालून बो टाय लावल्यासारख्या काळ्या कंठाचे, पिवळ्या चोचींचे, ठुमकत चालणारे हे पक्षी कळपांनी बघायची हौस होती. पण त्यांचा हंगाम कोणता हे पुता अरीनासला येऊन पोचेपर्यंत आम्हांला माहीत नव्हतं. पेन्ग्विन्सचं वेळापत्रक अगदी चोख आखलेलं असतं.
दरवर्षी ठीक १० नोव्हेंबरला नरांची 'पायलट टीम' नदीतून वर पोहत जाते. हा चाचणी गट बेटावर पोहोचला, की उरलेल्यांची वाट पाहत तिथं थांबतो. २४ नोव्हेंबरला बाकीचे नर येतात आणि तिथं असलेल्या आपल्या जुन्या बिळांचा ताबा घेऊन त्याची डागडुजी करतात. चकचकीत दगड-शिंपांनी घरं सजवून आपापल्या माद्यांची वाट बघत असतात. यथावकाश माद्यांचा मेळावा आला की त्यांच्या पन्नास-पन्नास हजार जोड्या जमून या बेटावर रमतात.
पेन्ग्विन जन्मभर एकपत्नीव्रत पाळतो. प्रत्येक जोडी ठरावीक जमीन आपल्या मालकीची समजून तिथून बाकीच्यांना हुसकावून लावते. मग मादी तिथं दोन-तीन अंडी घालते. नर पेन्ग्विन आदर्श पिताही असतो. तो अंडी उबविण्यापासून मासे मारण्यापर्यंत सगळ्या कामात सिंहाचा वाटा उचलतो. अंडी उभ्यानंच उबवावी लागतात. बर्फासारख्या गार जमिनीवर ती ठेवली तर थंडीनं करपून जातील म्हणून ती त्यांना आपल्या पायांवर अलगद तोलावी लागतात. उबेसाठी अंगच्या पिसांनी झाकावी लागतात. पुढे त्यांतून पिल्लं बाहेर पडली की तो त्यांना मासेही चारतो. पेन्ग्विनीण बाई खर्या सुखी म्हणायच्या.
त्यांचा हा आदर्श संसार एप्रिलमध्ये संपतो. मुलं मोठी होऊन स्वतःचं पाहू लागतात. थंडीची पहिली चाहूल लागली की सगळेजण परत अँटार्क्टिकाच्या बर्फावर घसरगुंड्या खेळायला निघून जातात. अशा या एकमार्गी निरुपद्रवी निष्पाप पक्ष्याला मारावंसं कुणाला वाटेल?
पण १५९३ साली जॉन डेव्हिस नावाच्या इंग्लिश कॅप्टननं आणि त्याच्या खलाशांनी पोटासाठी ते पाप केलं. त्यांनी वीस हजार पेन्ग्विन्सची इथं कत्तल केली. तोवर या निरागस पक्ष्यांना शत्रू कसा तो माहीत नव्हता. त्यामुळे त्यांना पकडून मारणं फार सोपं होतं. एवढे पक्षी मारून, वाळवून, खारवून त्यांनी आपल्या परतीच्या प्रवासाची तरतूद केली. हे झालं ऑक्टोबर महिन्यात. डिसेंबरमध्ये त्यांचं जहाज विषुववृत्तावर पोचलं. हवा गरम झाली आणि पेन्ग्विन्सनी सूड उगवला.
त्यांच्या खारावलेल्या मांसात बोटबोट लांबीच्या आळ्या पडल्या. लोखंड सोडता बाकीच्या सगळ्या गोष्टी फस्त करून टाकायचा या आळ्यांनी सपाटा लावला. कपडे, बिछाने, बुट्स, हॅट्स, चामडी पट्टे आणि खलाशांचे हातपाय जे समोर येईल ते स्वाहा होऊ लागलं. त्यांनी बोटीचं लाकूडसुद्धा कुरतडल्यामुळे बोट बुडायची पाळी आली. माराव्यात तितक्या जास्तच तयार.
कर्कवृत्तापर्यंत येईतो बोटीवरच्या खलाशांना स्कर्वी रोगानं पछाडलं. अंगावर अशी सूज आली की त्यांना झोपणंसुद्धा अशक्य झालं. ते पटापट मरायला लागले. शहात्तरपैकी फक्त पाचजण उरले. त्यांचं तारू भरकटत कसंतरी इंग्लंडला पोचलं. डेव्हिसनं स्वतःच्या डायरीत लिहून ठेवलेल्या या इत्थंभूत वृत्तांताच्या आधारे पुढे इंग्लिश कवी कोलरिजनं 'द राइम ऑफ द एन्शन्ट मॅरीनर' हे अमर काव्य लिहिलं.
असा चित्तथरारक साहित्यिक इतिहास असलेल्या या पक्ष्यांनी दगा दिल्यावर 'कुठल्याही ऋतूत आलो तरी काहीतरी पाहायचं हुकणारच' असं मनाचं समाधान करून घेत नॅशनल पार्कच्या दिशेनं मोर्चा वळवला.
गावात 'मालव्हीनास'चं मोठं प्रस्थ. मालव्हीनास म्हणजे 'फॉकलंड्स बेट'. १९८२ साली त्याच्या मालकीसाठी आर्जेंटिनानं ब्रिटनशी युद्ध पुकारलं आणि सपाटून मार खाल्ला. बेटं दोनशे वर्षं ब्रिटिश होती ती पुन्हा ब्रिटिशच राहिली. कोट्यावधी पौंड खर्च झाल्यावर ब्रिटिश साम्राज्याचा एक चामखीळ वाचला. टिचभर आकार आणी भयानक हवामान यांमुळे हजारो मैल दूरच्या ब्रिटनला किंवा शेजारच्या आर्जेंटिनाला ती बेटं सारखीच निरुपयोगी आहेत. 'न्यूयॉर्कर' या अमेरिकन साप्ताहिकानं या युद्धाचं यथोचित वर्णन केलं होतं - 'एका कंगव्यासाठी लागलेलं दोन टकल्यांचं भांडण.'
पण देशाभिमान ही काही और चीज असते. त्या विजयाच्या जोरावर ब्रिटनची मार्ग्रेट थॅचर पुन्हा निवडून आली. उलट आर्जेंटिना ती लढाई आपण जिंकल्याचा दावा करतो. इथल्या नकाशात मालव्हीनास बेटं आर्जेंटिनाची म्हणून चितारण्यात येतात. उश्वायाच्या मुख्य रस्त्याचं आणि प्रमुख चौकाचं नाव मालव्हीनास. मधोमध विजयस्तंभ. त्यावर लोखंडी जाळीत आर्जेंटियन नकाशा. याची ब्रिटनला दखल आहे की नाही कोण जाणे. कदाचित त्याकडे जाणूनबुजूनही काणाडोळा केलेला असेल. कारण फॉकलंड्स बेटावर सारे मिळून तीस रहिवासी. तेवढ्यासाठी पुन्हा युद्धाची खिटखिट नको. त्या चौकाचे, पाट्यांचे आणि नकाशाचे फोटो आमच्या इंग्लिश मित्रांना खिजविण्यासाठी खास काढून घेतले आणि पुढे निघालो.

*****

टँगो डान्स ही आर्जेंटिनानं जगाला दिलेली देणगी आहे. तो चुकवणं म्हणजे केरळात जाऊन कथ्थकली न पाहणं. रात्री तिथल्या एका नावाजलेल्या क्लबमध्ये गेलो. तिकिटं भरपूर महाग. तरी ते छोटं सभागृह गच्च भरलेलं होतं. अॅकॉर्डियनच्या वरखाली उडणार्या बेलाग सुरावटींवर हिंदकाळत होतं. खुर्चीशी खिळवून टँगो-नृत्य पाहण्यासाठी सगळे अधीर झालेले.
जाळीदार काळ्या कपड्यातल्या सडपातळ नर्तिका आणि काळ्यापांढर्या टेलकोट्समधले, पोमेड लावून उलट्या फिरवलेल्या तुकतुकीत केसांचे नर्तक स्टेजवर आले. वाद्यांच्या उत्कट साथीत त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. त्यांच्या हालचाली धीट, आक्रमक, उत्तेजक आणि उन्मादक. स्त्री-पुरुषांनी मिठीत येऊन तोंडमिळवणी करत नाचायचं. मांड्यांपासूनचे पाय इतके एकमेकांत की नाचताना घोटाळा होऊन एकाची टाच दुसर्याला कशी ठोकरत नाही याचं आश्चर्य वाटावं. प्रत्येक पदन्यास कडक. बाहुपाशात येतायेता दूर व्हायचं. चुंबनाला आतुरलेले ओठ, पण ते कधीच मिळत नाहीत. चेहर्यावर अनावर, अगतिक प्रेमाची अतीव दुखरी भावना उफाळून येत होती. नाचण्यात कमालीची चपलता. जोडीदारणीला बाहुलीसारखी उचलून उलटीसुद्धा फिरवत होते. दोन तास दहा जोडप्यांनी आणि टँगोच्या त्या विशिष्ट सुरावटींनी पार भारून टाकलं.
मूळचं हे नृत्य समाजाच्या तळातल्या वर्गाचं आणि वेश्यावस्तीतलं. पण विसाव्या शतकात त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली कार्लोस गार्डेल या नर्तकानं. कुमारी मातेच्या पोटी जन्मलेल्या या निर्वासित फ्रेंच मुलानं काबाडकष्ट करत ते शिकून घेतलं आणि आपल्या नाचगाण्यानं ब्वेनोझायरेसमधल्या तरुण पिढीला वेड लावलं. ते नृत्य न्यूयॉर्क-लंडन-पॅरिसपर्यंत पोहोचवलं. त्याला जगभर मान्यता मिळाल्यानंतरच कुठे आर्जेंटिनातल्या ढुढ्ढाचार्यांच्या माना हलल्या. टँगो शिष्टसंमत समजलं गेलं. १९३५ मध्ये विमान अपघातात गार्डेल वारला. पण त्याला अजून जिवंत असल्यासारखा मानतात. दुपारी लाव्हाले रस्त्याच्या कोपर्याकोपर्यावर भेटत होता तो देखणा हसरा चेहरा गार्डेलचा. एल्व्हिस प्रेज्लीसारखा त्याच्या चाहत्यांचा इथं फार मोठा संप्रदाय आहे.
क्लबबमधून बाहेर पडलो तेव्हा साडेदहा वाजले होते. पाहिलेल्या नाचानं मंत्रमुग्ध झाल्यानं आपणही चार पावलं टाकून पाहावीत अशी वर्षा आशूला तीव्र इच्छा झाली. अशा नवशिक्यांसाठी असलेल्या क्लबमध्ये त्यांना जायचं होतं. मी एकटीच हॉटेलमध्ये परत यायला निघाले. टॅक्सीत बसवून देताना आशूनं पाच आणि दोन डॉलर्सची एकेक नोट माझ्या हातावर ठेवली. मी एकटी निघाले खरी पण मनात अस्वस्थ होते. नवखं शहर. अनोळखी रस्ते. हॉटेल कुठे आहे कोण जाणे. आपल्याला खूप फिरवलं तर? किंवा भलतीकडेच नेलं तर? निरखून बाहेर बघत होते. येताना पाहिलेल्या काही खुणा दिसताहेत का त्याचा अंदाज घेत होते.
काही विपरीत न घडता लगेच हॉटेलवर पोहोचले. टॅक्सी रस्त्याच्या दुसर्या बाजूला अंधारात उभी राहिली. मीटरवर तीन डॉलर्स झाले होते म्हणून मी पाच डॉलर्स टॅक्सी ड्रायव्हरच्या हातात देऊन मोडीची वाट पाहत असताना त्याने आणखी पैशासाठी हात पुढे केला. मी खुणेनं कसले म्हणून विचारताच त्यानं त्याच्या हातातली दोन डॉलर्सची नोट दाखवली. तेव्हा आशूनं चुकून मला दोन्ही दोन डॉलर्सच्या नोटा दिल्या असाव्यात अशा समजुतीनं मी दुसरी नोट त्याच्या हाती ठेवली. एक डॉलर टिप दिलीसं समजून मी बाहेर पडले पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.
दुसर्या दिवशी मी आशूला विचारलं. त्यानं मला सात डॉलर्सच दिले होते. टॅक्सी ड्रायव्हरनं हातचलाखी करून माझ्या पाचाच्या जागी दोनची नोट दाखवली होती. अंधाराचा आणि माझ्या भांबावण्याचा फायदा घेऊन मला हातोहात फसवलं होतं. दक्षिण अमेरिकेत हातचलाखीच्या अशा लांड्यालबाड्या खूप चालतात. सुदैवानं त्यांची ही एकच चुणूक मला मिळाली.

पुढच्या खडकाळ कड्यालगतच्या दगडांवर अॅल्बट्रॉस पक्षी वस्तीला होते. समुद्राचा राजा असलेल्या या मोठ्या पक्ष्याला उडण्याच्या सुरुवातीला उंच कड्याचा आधार लागतो. त्याला जमिनीवर भरभर पळून वेग घेता येत नाही. कड्याच्या शेवटी उडी मारून उड्डाण करावं लागतं. अशी एकदोन उड्डाणं बघायला मिळाली.
पाचफुटी पंखांचा एवढा प्रचंड पक्षी कड्यावरून टुणकन उडी मारून झेपावतो. पण त्याला त्याची भीती वाटत असावी. कड्याच्या टोकाला बराच वेळ तो 'उडू की नको' या संभ्रमात बसलेला दिसतो. इतर पक्षी पुटकन येतात नि उडून जातात, हा तिथेच. पण एकदा झेप घेतली की या सर्वात मोठ्या समुद्रपक्ष्याचं शुभ्रपंखी देखणेपण मोहून टाकतं. तो दिसेनासा होईतो डोळे त्याचा पाठलाग करत राहतात.
त्याची आणखी मोहक गोष्ट म्हणजे त्यांचं प्रियाराधन. डावीकडे चिल्लर झुडुपांतून गेलेली एक पायवाट होती. तिथं ते बहराला आलं होतं. गळ्यात गळा घालणं काय, पंख फुलवणं काय, चोचीत चोच काय, विचारू नका. तासतासभर त्यातच गुंग. आम्ही आसपास आहोत याचं भानही नाही. हाईडपार्कमधल्या मानवी युगुलांची आठवण येत होती. फारच रोमँटिक. वर्षातून अंडी एकदाच घालतात. मीलन मात्र सारखं.
त्यांच्या ५०-५५ वर्षांच्या सहजीवनासाठी हे पक्षी एकदाच आणि एकच जोडीदार निवडतात. जोडप्यापैकी नर वा मादी कुणीही आधी मेलं की दुसरा अन्नपाण्याचा त्याग करून थोड्या दिवसांत तीच वाट धरतो. एक पति-पत्नीव्रताचं हे काटेकोर पालन ऐकून माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो न दुणावतो तो मार्टिननं त्यांच्याबद्दलचं आणखी एक सत्य सांगितलं.
जमिनीवरील प्रजननाचं काम डिसेंबरमधे संपलं की जानेवारी ते एप्रिल हे चार महिने अॅल्बट्रॉस पक्षी समुदावर काढतात. डिसेंबरच्या अखेरीचं हे घाऊक प्रयाण बघण्यासारखं असतं. लढावू विमानं जशी धावपट्टीवरून लागोपाठ सुटतात तसे हे एकूण एक पक्षी कड्यावरून झेप घेत आकाशगामी होतात. एप्रिलमध्ये परतताना आधी मोठे नर, मग त्यांच्या माद्या, मग या मोसमातले नवे नर आणि सरतेशेवटी नव्या माद्या या क्रमानं येतात. एकेका आठवड्याला एकेक गट इथं उतरतो.
आधीचे तीन महिने समुद्रावर काढल्यानं त्यांच्या पंखांचे स्नायू तयार झालेले असतात. पण वापरले न गेल्यानं पायांचे कमजोर होतात. खडकांवर उतरणं त्यांना कठीण होतं. ते कोलमडतात. धडपडतात. खुरडत खुरडत पुढे सरकतात. पण लवकरच सावरतात. आतापर्यंत ते जमिनीला चांगले सरावलेले असतात. तरुण माद्यांचा हा शेवटचा गट आला की हे नर त्यांच्यावर झडप घालून, त्यांना हलता येत नसण्याच्या स्थितीत त्यांचा यथेच्छ उपभोग घेतात आणि पुन्हा आपलं 'एकपत्नीव्रत' पाळायला साळसूदासारखे निघून जातात. ते असं का करतात या कोड्याचं उत्तर जीवशास्त्रज्ञांना सापडत नाही. - पुरुष! दुसरं काय?

लेखिकेचं हे प्रवासवर्णन अतिशय वाचनीय आणि थक्क करून सोडणारं आहे. विशेषतः यात स्थळवर्णनाबरोबरच अगदी सहजपणे त्या स्थळाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि जैवविविधतेची माहिती ही तर केवळ अविश्वसनीय वाटावी अशीच कमालीची रंजक आहे. दोनशे पंच्याण्णव पानांचं हे पुस्तक एकदा हाती घेतलं की एका बैठकीत संपूर्णतः वाचून काढल्याखेरीज खाली ठेवलं जात नाही.
पण...
इतक्या लांबच्या प्रदेशांत जाऊन आपण या माहितीची सत्यासत्यता तपासू शकत नाही. लेखिकेवर पूर्णतः विसंबून राहण्याखेरीज आपल्याला गत्यंतर नाही. तसा विश्वास वाचक टाकतोही पण अचानक एके ठिकाणी या विश्वासालाच तडा जातो. रीओ द जनैरो - ब्राझिल इथल्या येशूच्या भव्य पुतळ्याशी तुलना करताना लेखिका जेव्हा श्रवणबेळगोळ येथील महावीराचा पुतळा असा उल्लेख करते तेव्हा या अज्ञानाविषयी एकाच वेळी आश्चर्य, खेद, संताप आणि कणव या भावना दाटून येतात. श्रवणबेळगोळ येथील पुतळा महावीरांचा नसून गोमटेश्वर बाहुबलीचा आहे हेदेखील इतकी प्रचंड भटकंती केलेल्या या लेखिकेला ठाऊक नसावं? महावीर हे जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर. तर बाहुबली हा पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा पुत्र. आपला ज्येष्ठ बंधू भरत याला बाहुबलीने केवळ प्रचंड शारिरीक बळावर द्वंद्वात हरविलं आणि नंतर वैराग्य येऊन उभ्यानेच एक तप (बारा वर्षे) साधना केली. या बारा वर्षांत त्यांच्या कमरेपर्यंत वेली चढल्याचंही पुतळ्याच्या रचनेत स्पष्ट दिसतं. तसेच बाहुबली हा त्याच्या प्रचंड आकाराकरिता प्रसिद्ध असल्यानेच हा तब्बल सत्तावन्न फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. श्रवणबेळगोळला भेट देतेवेळी लेखिकेला इतकी सामान्य व सर्वज्ञात माहिती मिळू शकली नाही काय? पुतळ्याच्या शरीराचा आकार आणि भोवती लगटलेल्या लतावेली या कशाचेही महावीरांशी काहीच साम्य नाही, शिवाय काळही अत्यंत वेगळा. भारतातल्या एका सुप्रसिद्ध स्थळाविषयी लेखिकेला इतकी चुकीची माहिती असेल तर मग या दूरच्या प्रदेशाविषयी लेखिकेने दिलेल्या माहितीवर विश्वास तरी कसा ठेवावा?
असो. अज्ञान प्रकट करून लेखिका थांबली असती तरी एकवेळ समजून घेता आले असते. परंतु इथे तर लेखिकेने आपला एका समाजाविषयीचा आकसच जाहीर रीत्या प्रकट केला आहे. शीखांना एक्वादोरमध्ये कुठलेही नागरिक असले तरी अजिबात प्रवेश नाही हे समजल्यावर कोणा व्यक्तीला तिच्या धर्मासाठी असं अडवणं हे लेखिकेला पटत नसल्याचं ती नमूद करत असली तरी स्वतः मात्र मारवाडी समाजाविषयी नकारात्मक मतप्रदर्शन सहज करते. लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाना "मारवाडी रंग" म्हणून नाक मुरडण्याचा उल्लेख पुस्तकात चक्क वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा येतो. हे वाचताना निश्चितच खटकते.
दक्षिणरंग
मीना प्रभु
पुरंदरे प्रकाशन
मुल्य रु.३००/-